साध सोप्प आयुष्य साध सोप्प
जगायचं
हसावस वाटल तर हसायचं, रडावस
वाटल तर रडायचं
जस बोलतो तस नेहमी वागायला
थोडाच हव
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडाच हव
ज्यांना सांगायचं त्यांना
सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना
टांगायचं
मनात जे जे येते ते ते करून
बघितले पाहिजे आपण
जस वागाव वाटत तसच जगून
बघितलं पाहिजे आपण
करावस वाटेल ते करायचं
जगावस वाटेल तस जगायचं
आपला दिवस येतो जेव्हा जाग आपल्याला
येते
आपली रात्र होते जेव्हा झोप
आपल्याला येते
झोप आली कि झोपायचं आणि जाग
आली कि उठायचं
पिठलं भाकरी मजेत खायची जशी
पक्वान्नं पानात
आपल्या घरात अस वावरायचं,
जसा सिंह रानात
आपल्या जेवणाचे, आपल्या
जगण्याचं आणि आपल्या वागण्याच
आपणच कौतूक करायाचं
साध सोप्प आयुष्य साध सोप्प
जगायचं
हसावस वाटल तर हसायचं, रडावस
वाटल तर रडायचं
असेल हि चंद्र मोठा त्याच
कौतुक कशाला एवढ
जगात दुसर चांदण नाही
आपल्या हसण्या एवढ....
साठवनितली कविता
No comments:
Post a Comment